लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांची यादी

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांची यादी


महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाने अधिसूचित सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालबद्ध पद्धतीने सेवा मिळाव्यात हे याचे उद्दिष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सातत्याने ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठित करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व दहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

पात्र नागरिकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमभंग केल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधित वरिष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपील करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपील करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे https://aaplesarkar.mahaonline.gov.in